वणी : बोलत नसल्याचे तसेच मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या कारणावरून प्रियकराने प्रेयसीच्या घरात घुसून राडा केला. एवढेच नव्हे तर घरातील सामानाची नासधूस करून जीवे मारण्याची धमकी तिला दिली. प्रेयसीच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिला दोन मुली असून पतीसोबत पटत नसल्यामुळे मागील सहा वर्षापासून भाड्याच्या घरात राहते. शहरालगत असलेल्या गावातील एका विवाहित व्यक्तीसोबत मागील 6 वर्षापासून तिचे प्रेमसंबंध असून तिच्या घरात त्याचे येणे जाने होते. दिनांक 25 नोव्हे. रोजी रात्री 9 वाजता दरम्यान पीडिता आपल्या घरी असताना आरोपी प्रियकर दारू पिऊन आला व घरासमोर उभा होऊन मोठ्या आवाजाने शिवीगाळ करायला लागला. फिर्यादी महिला घराचा दार उघडून बाहेर आली असता त्यांनी तुझे माझे प्रेम संबंध आहे, तू माझा नंबर का ब्लॉक केला ? माझ्या सोबत तू का बोलत नाही असे बोलून बळजबरीने घरात घुसला.
एवढेच नव्हे तर त्यांनी फिर्यादी व तिच्या मुलीला मारहाण करून घरातील फ्रीज व इतर सामानाची नासधूस केली. दोघांचे फोटो फेसबुक व नातेवाईकाना व्हायरल करण्याची तसेच रस्त्यावर दिसल्यास जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली. त्यामुळे पीडिताने तत्काळ पोलीस स्टेशन गाठून आरोपी प्रियकर विरुद्ध तक्रार नोंदविली. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्द कलम 323, 427, 452, 504, 506 भादवि अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
(बातमी वणी पो.स्टे. मध्ये दाखल FIR वरून )