वणी टाईम्स न्युज : शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या फरार आरोपीला पकडण्यात शिरपूर पोलिसांना यश आले आहे. आरोपी बाबत मिळालेल्या गुप्त माहितीवरुन पोलीस निरीक्षक माधव शिंदे यांचे आदेशाने सपोनि रावसाहेब बुधवंत यांनी पोलीस स्टाफसह चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथून आरोपी नौशाद शहादातुल्ला कुरैशी (34)याला ताब्यात घेऊन अटक केली.
आरोपीवर शिरपूर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 248/2021 कलम 399, 402 अन्वये गुन्हा दाखल असून आरोपी मागील 3 वर्षापासून फरार होता. अटकेतील आरोपीला गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी सत्र न्यायालय केळापूर येथे हजर केले असता न्यायालयाने त्याची यवतमाळ जिल्हा कारागृहात रवानगी केली.