वणी : शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावातून शिक्षणाकरिता गेलेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनी शाळेतून बेपत्ता झाल्याची तक्रार शिरपूर पोलीस ठाण्यात सोमवार 1 मार्च रोजी नोंदविण्यात आली होती. शिरपूर पोलिसांनी तत्काळ तपासचक्र फिरवून अवघ्या काही तासात चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथून दोन्ही मुलीची सुटका केली. पोलिसांनी मुलीना पळवून नेणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक करून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील एका गावात आठवीत शिकणारी मुलगी तिच्या 17 वर्षाच्या मैत्रिणीसह 30 मार्च रोजी शाळेत गेली होती. दुपारच्या सुट्टीच्यावेळी मुलीने तिच्या मोठी बहिणीला मी मैत्रिणीसोबत शाळेच्या बाहेर जाऊन परत येतो. असे सांगून दोघी शाळा बाहेर गेली. परंतु शाळा सुटेपर्यंत त्या परत आल्या नाही.
वडिलांनी व कुटुंबियांनी दोघींच्या नातेवाईकांकडे तसेच वणी, गडचांदूर, कोरपना, राजुरा, बल्लारशाह, चंद्रपूर, भद्रावती इत्यादी ठिकाणी शोध घेतला. मात्र दोघी मिळून आल्या नाही. त्यामुळे अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून एका मुलीच्या वडिलांनी 1 एप्रिल रोजी सायंकाळी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्द कलम 363 नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.
शिरपूरचे ठाणेदार सपोनि माधव शिंदे यांनी जलदगतीने तपासचक्र फिरवून पीएसआय बुधवंत यांचे नेतृवत एक पोलीस पथक राजुरा येथे पाठविले. पोलीस पथकाने रात्रीच राजुरा येथून दोन्ही मुली व त्यांना पळवून नेणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेऊन शिरपूर येथे आणले. सुटका झालेल्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी राहुल मडावी (24) व निखील शिडाम (23) दोघे रा. ता. कोरपना विरुद्द भाद्वी कलम 376 आणि बालकांचे लैंगिक शोषण पासून संरक्षण (पोस्को) कायदानुसार गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.