वणी टाईम्स न्युज : अवघ्या 14 दिवसांपूर्वीच तिने एक गोंडस बाळाला जन्म दिला होता. आई झाल्याच्या आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसून पडत होता. अशातच 6 मे च्या रोजी मध्यरात्री ती बाळाला झोपेतच सोडून अचानक घरातून बेपत्ता झाली. सोमवार 7 मे रोजी सकाळी घरच्या लोकांना ती दिसून पडली नाही. घरात व आजुबाजुला शोध घेतला असता ती कुठंही मिळून आली नाही. गावकऱ्यांच्या मदतीने गावात व लगतच्या जंगलात शोध घेताना सायंकाळी गावातच असलेल्या विहिरीमध्ये तिचा मृतदेह आढळला.
मन हेलावून टाकणारी ही घटना मारेगाव तालुक्यातील बोटोणी गावात उघडकीस आली. शुभांगी विपुल लालसरे (24) असे मृतक महिलेचे नाव आहे. मृतका शुभांगी मारेगाव तालुका भाजप अध्यक्ष शंकर लालसरे व माजी पंचायत समिती सदस्या सुनीता लालसरे यांची सून होती. मागील वर्षी 16 एप्रिल 2023 रोजी तिचा विवाह विपुल लालसरे सोबत झाला होता. आणि 14 दिवसांपूर्वी 24 एप्रिल 2024 रोजी तिची प्रसूती झाली.
अवघ्या 14 दिवसाच्या नवजात बाळाला सोडून शुभांगी हिने आत्महत्या केली की, तिच्या सोबत काही घातपात घडला. याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र नवजात बाळाला आईच्या दुधेसाठी व्याकूळ बघून कुटुंबीयांचे व संपूर्ण गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूचे पाझर फुटले आहे. घटनेबाबत मारेगाव पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.