वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांची पत्नी शर्मिलाताई ठाकरे गुरुवार 1 फेब्रुवारी रोजी वणी येथे येणार आहे. वणी येथे सुरु असलेले काशी शिवपुराण कथा निमित्याने त्यांचा हा दौरा असल्याची माहिती आहे. त्यांच्या सोबत मनसे सरचिटणीस रिटा गुप्ता व इतर मनसे पदाधिकारीही येणार आहे. शर्मिलाताई परसोडा येथे सुरु असलेले पंडित प्रदीप मिश्रा यांचे काशी शिवपुराण कथेचा लाभ घेणार आहे.
शर्मिलाताई ठाकरे यांचे पहिल्यांदा वणी आगमन प्रसंगी त्यांच्या जोरदार स्वागत करण्याची तय्यारी मनसे कडून करण्यात येत आहे. शहरात ठिकठिकाणी बॅनर व होर्डिंग लावण्यात आले आहे. वणी आगमनानंतर दुपारी 2 वाजता त्यांची नांदेपेरा मार्गावरील मनसे संपर्क कार्यालय शिवमुद्रा येथे भेट व मनसे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता शर्मिलाताई ठाकरे, रिटा गुप्ता व मनसे नेता राजू उंबरकर शिव महापुराण कथा स्थळी पोहचून कथा श्रवणचा लाभ घेणार आहे. त्यानंतर उद्याची महाआरती शर्मिलाताई यांचे हस्ते होणार आहे.
शिव महापुराण कथा निमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे वणी येथे येणार असल्याची चर्चा होती. परंतु काही कारणास्तव त्यांचा दौरा रद्द झाल्याने त्यांची अर्धांगिनी शर्मिलाताई ठाकरे ह्या वणी येथे येणार आहे. येत्या काही महिन्यात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शर्मिला ठाकरे यांचा वणी दौऱ्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.