वणी टाईम्स न्युज : संपूर्ण राज्यात महायुती उमेदवारांची विजयी घोडदौड सुरु असताना वणी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांनी भाजपचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा पराभव केला. मतमोजणीच्या 20 व्या फेरीअंती संजय देरकर यांनी संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यावर 12 हजार 959 मतांनी आघाडी घेतली. मतमोजणीच्या आणखी 5 फेऱ्या शिल्लक असून लीड आणखी वाढण्याची शक्यता आहे.
संजय देरकर यांचा विजय पक्का झाल्याचे कळताच महाविकास आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांनी टिळक चौकावर एकच जल्लोष करत फटाके फोडले. मागील 4 विधानसभा निवडणुकीत संजय देरकर यांना यश मिळविता आले नाही. मात्र या निवडणुकीत सत्ता विरोधी लाट असल्याने देरकर यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
या निवडणुकीत अपक्ष संजय खाडे यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीचे समीकरण बदलणार, अशी खमंग चर्चा होती. तसेच लाडकी बहीण योजनेमुळे भाजप उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना तिसऱ्यांदा निवडून येण्याची खात्री होती. मात्र शेतकऱ्यांची नाराजी व लोकसभा निवडणुकीप्रमाणे जातीचे राजकारण भाजप उमेदवाराच्या हॅट्रिक करण्यास अडथळा झाले.
मतमोजणीच्या सर्व आकडे हाती आल्यास बातमी अपडेट करण्यात येईल.
व्हिडिओ पहा –