वणी टाईम्स न्युज : वणी विधानसभा मतदार संघातून संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय पांडुरंग धोबे यांना संभाजी ब्रिगेड पक्षातून तसेच जिल्हाध्यक्ष पदावरून तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. निवडणुकीत उमेदवारी मागे घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यावरून संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्यालयाने हे कार्यवाही केली आहे.
विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रत्येक पक्ष अनेक संघटनांचे पाठिंबा जुळवण्यासाठी धडपड करीत आहे. अशातच 4 नोव्हेंबर रोजी वणी विधानसभेतून संभाजी ब्रिगेडचे उमेदवार अजय पांडुरंग धोबे यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेऊन महा विकास आघाडीचे उमेदवार संजय नीलकंठराव देरकर यांना संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे पक्ष धोरणाविरोधात जाऊन काम केल्याचं ठपका ठेवून संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर यांनी अजय धोबे यांना पक्षातून निलंबित केल्याचे आदेश दिले.
सनातनी प्रवृत्ती आणि वेगळे पुरोगामी विचारविरुद्ध आमचा लढा – मनोज आखरे
संभाजी ब्रिगेड हा एक स्वतंत्र पक्ष आहे. महायुतीचे सनातनी प्रवृत्ती आणि महाविकास आघाडीचे वेगळे पुरोगामी विचाराविरुध्द आमचा लढा आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यात आम्ही कुठेही महायुती आणि महा विकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिले नाही. वणी येथील उमेदवारांनी वरिष्ठांना कोणतीही सूचना न देता स्वतच्या हित लाभासाठी केलेल्या कृत्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
मनोज आखरे – प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड (महाराष्ट्र राज्य)