वणी : दारू पिण्याची सवयी असलेल्या युवकाचा जास्त प्रमाणात दारू प्यायल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री दरम्यान उघडकीस आली. अतिश अशोक लाडे (42) असा मृत युवकाचा नाव आहे. मृतक हा रेल्वे विभागात कार्यरत पत्नी सोबत रेल्वे क्वार्टरमध्ये राहत होता.
प्राप्त माहितीनुसार मृतक अतिश याला दारू पिण्याचे व्यसन जडले होते. त्यामुळे नेहमी पती पत्नीमध्ये भांडण व्हायचे. रोजच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी आपल्या चार वर्षाच्या मुलाला घेऊन काही दिवसांपासून माहेरी राहत होती. तर अतिश हा रेल्वे क्वार्टरमध्ये एकटाच राहत होता.
सोमवार 18 मार्च रोजी अति दारू प्यायल्यामुले अतिश याला अस्वस्थ वाटू लागला. तेव्हा त्यांनी चंद्रपूर येथे आपल्या आईला फोन केला. त्याच्या आईने अतिशच्या पत्नीला फोन केला, मात्र तिनं फोन उचलला नाही. काही वेळा ने अतिशच्या चुलत भावाने तिला फोन करून अतिशची तब्येत खराब असल्याची माहिती दिली. तेव्हा अतिशची पत्नीने रेल्वे क्वार्टरमध्ये जाऊन पाहणी केली असता बेडवर अतिशचा मृतदेह आढळला.
घटनेबाबत माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयाच्या मोर्चरी मध्ये ठेवला. बातमी लिहेपर्यंत मृतकाचे नातेवाईक ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टमच्या प्रतीक्षेत बसून आहे.