वणी टाईम्स न्युज : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वणी नगर परिषदेकडून गांधी चौकातील 160 दुकान गाळे खाली करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नगर परिषद प्रशासनाने गाळे धारकांना 20 डिसेंबर पर्यंत आपले समान काढून देण्याची मुदत दिली होती. मात्र 20 डिसेंबर पर्यंत एकही दुकानदारांनी दुकाने खाली करण्याची हालचाली केल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे येत्या 1-2 दिवसात पोलीस बंदोबस्तात गाळे खाली करुन घेण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. त्यासाठी नगर परिषद मुख्याधिकारी यांनी पोलीस प्रशासनाला पत्र देऊन 50 पोलीस कर्मचाऱ्याचा बंदोबस्त देण्याची मागणी केल्याची माहिती आहे.
नगर परिषदच्या मालकीचे गांधी चौक येथील 160 दुकान गाळे रिकामे करण्यासाठी 20 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर आम्ही पोलीस बंदोबस्तात गाळे खाली करण्याची कारवाई करणार. त्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.
सचिन गाडे – मुख्याधिकारी नगर परिषद, वणी
गांधी चौक येथे दुकान गाळे खाली करण्यासाठी नगर परिषद कडून पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची मागणीचे पत्र आले आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. येत्या एक दोन दिवसात पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देणार.
अनिल बेहरानी – पोलीस निरीक्षक, पो. स्टे. वणी
गांधी चौक दुकान गाळे प्रकरणात व्यापारी संघटनेकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने पुढील 4 आठवडे पर्यंत ” यथास्थिती’ ठेवण्याचे आदेश शुक्रवार 20 डिसेंबर रोजी दिले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने खाली करण्याची घाई करू नये.
राकेश खुराणा – व्यापारी, गांधी चौक