वणी टाईम्स न्युज : पाटण पोलीस स्टेशन हद्दीत दुर्भा गावाजवळ गुरुवारी रात्री एका इसमाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करणाऱ्या 4 आरोपींना स्था.गु. शाखा पथकाने अटक केली आहे. खुनाचा मुख्य सूत्रधार दुर्भा येथीलच नवन अशोक बद्दमवार याला पोलिसांनी नांदेड रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले. तो पुणे येथे पळून जाण्याचा तयारीत होता. एलसीबी पथकाने वेगाने तपासचक्र फिरवून घटनेच्या 24 तासाच्या आत सर्व आरोपींना अटक केली आहे.
अरुण रामदास झांबरे (25) रा. पिंपळगाव (ईजारा) ता. महागाव, अनिल कैलाश आवशे (29), कैलाश प्रकाश बोडके (25) दोघं रा. हीवाळणी काली दौलत, ता. महागाव, व मुख्य आरोपी नवन अशोक बद्दमवार (29) रा. दुर्भा (नवीन) ता. झरी जामणी असे आरोपीचे नाव आहे. मुख्य आरोपी नवन बद्दमवार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शासकीय अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणेसह अनेक गंभीर गुन्हा दाखल आहे. आरोपी यांनी जुन्या वादातून अशोक दयालाल भेदोडकर, रा. दुर्भा याचा खून केल्याचं सांगण्यात येते.
पोलीस अधीक्षक कुमार चीता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात, LCB चे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते, API अजयकुमार वाढवे, PSI धनराज हाके, हेड कॉन्स्टेबल उल्हास कुरकुटे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे ना.पो. का.सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, पोलीस कॉ्स्टेबल रजनीकांत मडावी, चालक योगेश टेकाम या एलसीबी पथकाने ही कामगिरी बजावली.
वाचा संबंधित बातमी :