वणी टाईम्स न्युज : येथील सरोदय चौक परिसरात रहिवासी ललित लांजेवार (45) यांचा हृदय विकाराच्या धक्क्याने अकस्मात मृत्यू झाला. ते शिवसेना (शिंदे गट) शहर प्रमुख पदावर होते. बुधवारी रात्री 10 वाजता दरम्यान राहते घरी त्यांना हार्ट अटॅकचा झटका आला. त्यांना लगेच सुगम हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ललित यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांचे कुटुंबीय व मित्र परिवाराने दवाखान्यात एकच गर्दी केली.
ललित यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व आप्त कुटुंबीय व मित्र परिवार आहे. राजकीय क्षेत्रात ललित लांजेवार चिरपरिचित नाव होतं. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे ललित यांच्या अचानक एक्झीटमुळे कुटुंब व मित्र परिवार शोकमग्न झाले आहे.
अधिक माहिती मिळताच बातमी अपडेट केली जाईल