वणी टाईम्स न्युज : वेकोलिच्या उकणी खाणीत विद्युत शॉक लागून मृत्युमुखी पडलेल्या पट्टेदार वाघाचे दात व नखं काढून नेणारे 4 आरोपींना वन विभागाने अटक केली आहे. सतीश अशोक मांढरे (26) रा.वणी, नागेश विठ्ठल हीरादेव (40) रा.उकणी, आकाश नागेश धानोरकर (27) रा. वणी व रोशन सुभाष देरकर (28) रा. उकणी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी हे वेकोलिच्या निळजई कोळसा खाणीत कर्मचारी असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी वेकोलिच्या उकणी कोळसा खाणीत बोअरवेल जवळ झाडं झुडपात एका वाघाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. वनविभागाने केलेली पंचनाम्यात वाघाचे सुळे दात व काही नखं गायब असल्याचे आढळले. प्राथमिक तपासणीत वाघाचा मृत्यू विजेचा शॉक लागून झाल्याचा अंदाज लावण्यात आला होता. मात्र वाघाचे दात व नखं गायब असल्याने वाघाची हत्या केल्याच्या दृष्टीकोनातून तपास करण्यात आला.
वन विभागाने केलेल्या चौकशीनंतर मृत वाघाचे दात व नखं चोरणाऱ्या वरील चारही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना शुक्रवारी सायंकाळी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन आरोपींना वन कोठडी तर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
update : आरोपीने केला आत्महत्येचा प्रयत्न