वणी टाईम्स न्युज : 5 सप्टेंबर रोजी प्रगतीनगर येथे व्यावसायिकाच्या घरी झालेल्या दरोड्याची मास्टर माईंड वणी येथीलच एक महिला निघाली आहे. राणी विनोद ब्राह्मणे असं या ‘लेडी डॉनचा’ नाव आहे. आपल्या भाऊ व इतर नातेवाईकांच्या मदतीने राणी हिनेच व्यावसायिक सुभाष शंकरराव डोर्लीकर यांच्या घरी दरोडा टाकण्याची योजना आखली होती. पोलिसांनी मास्टर माईंड राणीसह इतर 4 आरोपींना अटक केली आहे. तर आणखी दोन आरोपी फरार आहे.
यवतमाळ स्थानिक गुन्हा शाखा पथकाने दरोडेखोरांच्या टोळीतील मुकिंदसिंग निक्कासिंग टाक व सावनसिंग मुकिंदसिंग टाक यांना शनिवारी जालना येथून ताब्यात घेतले होते. आरोपींना वणीत आणल्यानंतर विचारपूस केली असता त्यांनी वणी येथील साथीदारासह दरोडा टाकण्याच्या प्रयत्न केल्याची माहिती दिली. माहितीवरुन LCB पथकाने दीपक चौपाटी परिसरातून राणी विनोद ब्राह्मणे व तिचा भाऊ समिंदरसिंग बबलूसिंग टाक याला अटक केली.
दरोड्यात सहभागी आणखी एका आरोपीला LCB पथकाने मंगळवारी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथून ताब्यात घेऊन वणीत आणले असून फरार असलेले आणखी दोन आरोपीचा पोलीस कसून शोध घेत आहे. पोलिसांनी अटकेतील 4 आरोपींना रविवारी न्यायालयात हजर करून 3 दिवशी पोलीस कोठडी मिळविली आहे.
उल्लेखनीय आहे की, व्यावसायिक सुभाष डोर्लीकर यांचे प्रगतीनगर येथील घरामध्ये गुरुवार 5 सप्टेंबर रोजी मध्यरात्री हेल्मेट घातलेले 6 दरोडेखोरांनी मागील दाराने प्रवेश केला होता. घरात लुटपाट करीत असताना डोर्लीकर यांच्या मुलीला जाग आली. आणि तिनं आरडाओरड केल्यामुळे दरोडेखोर तेथून रिकामे हात पसार झाले. सदर घटनेत डोर्लीकर यांचे कुटुंब थोडक्यात बचावले होते. मागील काही काळापासून शहरात चोरी, दरोडा सारखी घटना घडत असताना कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.