चर्चा तर होणारच…!
वणी टाईम्स न्युज : वणी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे संजय देरकर यांना तिकीट देण्यावरून काँग्रेसच्या गोटात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. वणी हा काँग्रेस पक्षाचा पारंपरिक गड आहे. वणीची जागा काँग्रेस पक्षालाच सुटणार याची हमखास शास्वती काँग्रेसचे स्थानिक नेते व कार्यकर्त्यांना होती. उमेदवारीसाठी काँग्रेस पक्ष आग्रही असताना मात्र काँग्रेस नेत्यांना डावलून येथे शिवसेनेचे संजय देरकर यांना तिकीट देण्यात आला. ही बाब काँग्रेस कार्यकर्त्यांना पचनी पडली नाही.
दिल्ली व मुंबई पातळीवरील वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा स्थानिक काँग्रेस नेत्यांनी जोरदार विरोध दर्शविला आहे. वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्ष मजबूत आहे. पक्षात सक्षम नेतृत्वाची एक फळी आहे. काँग्रेसचे वामनराव कासावार यांनी चार टर्म वणी विधानसभेचा नेतृत्व केला आहे. असे असताना शिवसेनेला मदत करणे म्हणजे काँग्रेस पक्षाने आत्महत्या करण्या सारखे होईल. अशी खदखद कार्यकर्त्यांचा मनात आहे.
काँग्रेस पक्षाकडे माजी आमदार वामनराव कासावारसह संजय खाडे, डॉ. महेंद्र लोढा, टीकाराम कोंगरे, युवा नेता राजीव कासावार, आशिष खुलसंगे, महिला नैत्री अरुणाताई खंडाळकर सारखे सक्षम नेतृत्व उपलब्ध आहे. परंतु या सगळ्या नेतृत्वाला बाजूला सारून शिवसेना उमेदवारासाठी मताचा जोगवा मागण्यास काँग्रेसचा साधारण कार्यकर्ता मानसिक तयारीत नसल्याचे बोलले जाते.
वणीची जागा जरी महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेनेला सुटली असली तरी नामांकन दाखल होण्यापूर्वी सीट बदलून देण्याची काँग्रेस नेत्यांची मागणी आहे. आणि मागणी जर मान्य झाली नाही तर काँग्रेसचे काही नेते बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढण्याचा तयारीत असल्याची खमंग चर्चा सुरू आहे. पक्षांतर्गत सुरु भानगडी पाहता सद्या तरी महाविकास आघाडी उमेदवाराचे पाय खोलात असल्याचे चिन्ह दिसत आहे.
संबंधित बातमी :
खलबली : कांग्रेस पदाधिकारियों व कार्यकर्ताओं का सामुहिक त्यागपत्र..?