वणी टाईम्स न्युज : तालुक्यातील वांजरी येथे एका 18 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजता दरम्यान उघडकीस आली. ओमकार किशोर लडके (18) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. ओमकार यांनी गळफास लावलेल्या अवस्थेत त्याच्या मोठ्या वडिलांनी बघितले.
प्राप्त माहितीनुसार वांजरी गावातील किशोर लडके हे शेतकरी आहे. तसेच त्यांच्याकडे तीनचाकी ऑटो असून ते शालेय विद्यार्थ्यांना ने आण करतात. किशोर लडके यांना एक मुलगा ओमकार आणि एक मुलगी आहे. शुक्रवारी दुपारी 4.30 वाजे पर्यंत ओमकार हा गावात फिरत होता. सायंकाळी 5 वाजता दरम्यान ओमकार घरी गेला व सरळ दुसऱ्या मजल्यावर त्याच्या मोठ्या वडिलांच्या खोलीत जाऊन पंख्याला दुपट्टा बांधून गळफास घेतला.
5.30 वाजता दरम्यान मृतक ओमकार याचे मोठे वडील प्रदीप लडके आपल्या खोलीत गेले असता त्यांना ओमकार गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. कुटुंबीयांनी त्याला तात्काळ खाली उतरविला व ऑटो मध्ये वणी येथील एका खाजगी रुग्णालयात आणले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला ग्रामीण रुग्णालयात पाठविले. ग्रामीण रुग्णालयातील चिकित्सक यांनी त्याची तपासणी करून मृत घोषित केले. आई वडिलांना एकुलता असलेल्या ओमकार यांनी आत्महत्या सारखा पाऊल का उचलला. याबाबत अद्याप कारण स्पष्ट झाले नाही. घटनेची माहिती मिळताच वांजरी गावातील नागरिकांनी व नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली.