वणी टाईम्स न्युज : काँग्रेसचे वरिष्ठ नेते व वसंत शेतकरी जिंनिंग व प्रेसिंग फॅक्टरीचे माजी अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांचे संचालक पद रद्द करण्यात आले आहे. वसंत शेतकरी जिंनिंग व प्रेसिंग फॅक्टरीचे अध्यक्ष आशिष खुळसंगे यांनी 2 डिसेंबर रोजी एका आदेशान्वये ऍड. काळे यांना त्यांचे संचालक पद रद्द केल्याचे पत्र पोस्टाने पाठविले आहे. कलम 39 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
वसंत जिंनींगच्या संचालक मंडळाच्या मागील 6 बैठकीत सलग गैरहजर राहण्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर कार्यवाही केल्याचे अध्यक्ष आशिष खुळसंगे यांनी सांगितले आहे. ऍड. काळे हे वणी उप विभागात सहकार महर्षी म्हणून ओळखले जातात. वसंत जींनिंग फेक्टरीचे अनेक वर्ष अध्यक्ष होते. तसेच रंगनाथ स्वामी सहकारी पत संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. ऍड. देविदास काळे यांचे संचालक पद रद्द केल्याने राजनैतिक क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. ऍड. काळे यांच्यावर कारवाईला नुकतेच झालेल्या विधानसभा निवडणुकीशी संबंध असल्याची चर्चा आहे.