वणी टाईम्स न्युज : येथील मोमिनपुरा भागात एका युवकाला हॉकी स्टिकने मारहाणीच्या घटनेनंतर दोन गटात जबर राडा झाला. बुधवारी सायंकाळी 6 वाजता झालेल्या या घटनेत रात्री उशीर एकमेकांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील 14 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाणीच्या घटनेत जखमी युवकाला उपचारासाठी चंद्रपूर येथे दवाखान्यात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
फिर्यादी इमरान खान शाहबान खान (36) रा. मोमिनपुरा वणी यांनी तक्रार दिली की विटाचे पैसे देण्याच्या कारणावरून आरोपी यांनी संगनमत करून तसेच गैरकायदेशीर मंडळी जमवून त्याला थापड बुक्क्यांनी तसेच हॉकी स्टिकने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरुन कैफ हाफिज खान खान (34), सै. आयान सै. एजाज ( 26), सै. रेहान सै. एजाज (24), अफसर चीनी यासीम चीनी (30), अजहर चीनी यासीन चीनी (35), जमीरखान मेहबूब खान (43) व अयबाज खान अजीज खान (25) सर्व रा. मोमीनपुरा वणी विरुध्द कलम 118(1), 189(2), 191(2), 191(3), 190, 115(2), 352, 351 (2)(3) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या गटातील फिर्यादी मो.कैफ मो.हाफिज खान (23), रा. गुलशन नगर वणी यांनी आरोपीने लोखंडी रॉड व थापड बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार नोंदविली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी इसान शाबान खान (34), इस्माईल शाबान खान (40), छोटे खान शाबान खान (38) इरफान खान शाबान खान (32) व इतर 3 विरुध्द कलम 118(1),189 (2),191(2), 191(3),190, 115(2), 352, 351(2)(3) BNS नुसार गुन्हा दाखल केला.