वणी टाईम्स न्युज : वणी विधानसभा क्षेत्रातील ख्यातनाम समाजसेवक, कामगार नेते संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार 23 मे रोजी शेतकरी मंदिर परिसरातील वसंत जिनिंग हॉल येथे महिलांसाठी उद्योजकता प्रशिक्षण शिबिर तसेच भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
सकाळी 11 वाजता सुरू होणाऱ्या उद्योजकता प्रशिक्षण शिबिरात बचत गटातील महिला तसेच गृहउद्योग करणाऱ्या महिलांना उद्योग सुरू करणे, कर्जवाटप प्रक्रिया, आणि रोजगाराच्या संधी यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे मार्गदर्शन पांढरकवडा येथील उद्योग विषयातील तज्ज्ञ गणेश आत्राम करणार आहेत.
उद्योजकता शिबिरानंतर रक्तदान शिबिरास प्रारंभ होणार असून, संजय खाडे फाउंडेशन तर्फे या दोन्ही उपक्रमात सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.