वणी टाईम्स न्युज: पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत आज वणी येथे युवासेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ परिसरात हे आंदोलन पार पडले. युवासेनेच्या या तीव्र आंदोलनामुळे संपूर्ण परिसरात उत्स्फूर्त देशाभिमानाची लाट उसळली होती.
यावेळी “दहशतवाद मुर्दाबाद”, “पाकिस्तान मुर्दाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पाकिस्तानच्या झेंड्याला चप्पल मारून, तो जाळून प्रतीकात्मक तिरडी काढण्यात आली आणि पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. पर्यटकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारवर देखील यावेळी टीकेची झोड उठवण्यात आली. केंद्र सरकारच्या अपयशामुळेच असे हल्ले घडत असल्याचा आरोप करत, “देशाच्या सीमा सुरक्षित असल्याची बढाई मारणाऱ्यां” विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात युवासेनेचे सबिर शेख, कुंदन पेंदोर, मनोज वाकटी, गौरव पांडे, मिलिंद बावणे, आशुतोष नागबिडकर, विनोद दुमणे, धनराज येसेकर, आकाश तमिलवार, संदीप बावणे, शुभम नागपुरे, मयूर खांडरे, राजू चिंचोलकर, सचिन कळमनकर, आकाश पेंदोर, अनिकेत बदकल, अभिषेक गुंडावार, बादल येसेकर, आर्या राऊत, संघर्ष शेंडे, बबन केळकर आदींसह मोठ्या संख्येने युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.