वणी टाईम्स न्युज : धुलीवंदन निमित्त अ.भा. अती दिडशहाणे संमेलन समितीच्या वतीने 14 मार्च रोजी सायंकाळी हास्य कवि संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय मैदान (पाण्याची टॉकी जवळ) वणी येथे आयोजित या कवी संमेलनात शहरातील नागरिकांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक दिग्गज सीनेस्टार कवी शहरात येणार आहे.
मागील 25 वर्षापासून समिती तर्फे दीड शहाणे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई येथील हास्य कवी विनोद सोनी, जबलपूर येथील रश्मि किरण, आलसी कवी राजेंद्र मालविया, लाफ्टर किंग ज्यु. जानी लिवर एवं फिल्म स्टार मुजावर मालेगावी तसेच मंच संचालक किरण जोशी हे कवी श्रोत्यांना खदखदून हसायला लावणार आहेत.
हास्य कवी संमेलनात कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा. असे आवाहन आयोजन समितीचे राजु उंबरकर, रवि बेलुरकर, निकेत गुप्ता, राकेश खुराणा, राजाभाऊ पाथ्रडकर, आशिष खुलसंगे, प्रदिप बोनगिरवार, सुभाष तिवारी, बंटी खुराणा, दिपक छाजेड, तुषार अतकरे, भिकमचंद गोयनका, रमेश तांबे या दीड शहाण्यांनी केले आहे.