वणी टाईम्स न्युज : होळी व रंगपंचमी निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षीही वणी येथे महामूर्ख संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 14 मार्च रोजी दुपारी 2.30 वाजता शेतकरी मंदिर येथे आयोजित महामूर्ख संमेलनात शेगाव येथील हास्यकवी नितीन वरणकार, अकोला येथील हास्यकवी प्रो. संजय कावरे, गझलकार गोपाल मापारी सह वणी येथील कलावंत राजेश महाकुलकर, प्राचार्य हेमंत चौधरी व पुरुषोत्तम गावंडे हे रसिकांचे मनोरंजन करणार आहे.
महामूर्ख संमेलनाच्या आयोजनात किरणताई देरकर व संजय खाडे यांचे विशेष सहकार्य लाभले असून श्रोत्यांनी या महामूर्ख संमेलनाचा आस्वाद घेण्याचा आवाहन आयोजक मुन्नालाल तुगनायत, शशिकांत माळीचकर, जयचंद खेरा, प्रा.भुमारेड्डी बोदकुरवार, विलान बोदाडकर, गजानन बोढे यांनी केला आहे.