वणी टाईम्स न्युज : 8 मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजस्थानी महिला मंडळातर्फे महिला दिवस साजरा करण्यात आला. येथील जैन स्थानक आनंद भवनमध्ये आयोजित या कार्यक्रमात किरण देरकर, डॉ. सुलभा मुंजे व सुलोचना मुथा ह्या प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होत्या. यावेळी प्ले शाळेतील महिला मदतनीस यांचे सन्मान करण्यात आले. कार्यक्रमात हाऊजी व इतर खेळांचा महिलांनी मनसोक्त आनंद घेतला.
महिला दिवस कार्यक्रमात राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्ष समता चोरडिया, माजी अध्यक्षा चंचल मुथा, संगीता खटोड, निशा अग्रवाल, बरखा बाजोरिया, स्नेहलता चुंबळे, पायल आबड़, काजल काठेड, संजुलता कोठारी व इतर महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन खुशाली गुप्ता यांनी केले तर प्रेक्षा कटारिया हिने मानले.