वणी टाईम्स न्युज : ज्या मुलामुलींवर आईवडील जिवापाड प्रेम करतात, तेच मुलं आई वडिलांचा विश्वासघात करण्यात मागेपुढे पाहत नाही. 16 वर्ष ज्या मुलीला आईने धक्का लागू दिला नाही, त्याच मुलीने आईच्या विश्वासाला धक्का देऊन अनोळखी व्यक्ती सोबत घरून निघून गेली. मारेगाव तालुक्यात घडलेल्या या घटनेबाबत फिर्यादी वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
बेपत्ता मुलगी मारेगाव येथील एका महाविद्यालयात 11 व्या वर्गात शिक्षण घेत आहे. शुक्रवार 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आईवडिलांना घोंसा रोडवरील कॉम्प्युटर क्लासला जातो, असं सांगून मुलगी घराबाहेर पडली. मात्र रात्र झाली तरीही मुलगी परत घरी आली नाही. चिंतीत आई वडिलांनी घोंसा रोड परिसरात जाऊन शोध घेतला असता त्या मार्गावर कोणताही कॉम्प्युटर सेंटर नसल्याची माहिती मिळाली.
आई वडिलांची दिशाभूल करुन कुणीतरी अनोळखी व्यक्ती सोबत अल्पवयीन मुलगी निघून गेल्याचे कळताच वडिलांनी मारेगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरुद्ध कलम 137 (2) BNS नुसार गुन्हा दाखल केला आहे.