वणी टाईम्स न्युज : मागील काही काळापासून शहरात मादक पदार्थांची अवैधरीत्या आवक वाढल्याने तरुण व अल्पवयीन मुलं व्यसनाच्या विळख्यात सापडले आहेत. शहर पोलिसांनी शुक्रवारी जत्रा मैदान परिसरात सार्वजनिक ठिकाणी दोन युवकांना गांजा या मादक पदार्थांचा सेवन करताना पकडले. अनिरुद्ध बदखल (24) व अंकित तरवटकर (30) दोघं राहणार वणी असे गांजा सेवन करणाऱ्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध NDPS कायद्याच्या कलम 27, 8(c) नुसार गुन्हा दाखल केला आहे.