वणी टाईम्स न्युज : तालुक्यातील बोटोनी सारख्या खेड्यातून कमी वयात स्केटिंगमध्ये गोल्ड मेडलिस्ट ठरलेली मनस्वी विशाल पिंपरे गुरुवार 23 जानेवारी रोजी “स्केटिंग फॉर युवा” बोटोणी ते वणी हे 30 किलोमीटरचे अंतर स्केटिंग करून गाठले. याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या वतीने शहरातील छत्रपती चौकात तिचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. यावेळी मनस्वी चे आईवडील व तिचे कोच प्रशांत मल हे सुद्धा उपस्थित होते.

मनस्वीने बाल वयातच पराक्रमाचं उंच शिखर गाठलं आहे. तिने आपल्या पराक्रमाने गाव व तालुक्याचं नाव उंचावले आहे. कुणालाही हेवा वाटावा असं कर्तृत्व तिनं केलं आहे. स्केटिंगमध्ये 104 सुवर्ण पदक पटकावणारी मनस्वीने तरुण पिढीला संदेश देण्याकरिता व त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याकरिता बोटोणी वरून वणी येथे स्केटिंग केले. तिच्या जिद्द व पराक्रमाचा सन्मान व्हावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या बाल स्केटिंग पटूचं शहरात भव्य स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य नेते राजू उंबरकर यांनी हुरहुन्नरी व कर्तबगार मुलामुलींना यशस्वी वाटचालीकरता नेहमीच प्रोत्साहन देत असतात. मनस्वीने कमी वयात यशाचे उत्तुंग शिखर गाठल्याबद्दल तिचे अभिनंदन करतांनाच ती यशाचे नवनवीन शिखर गाठत राहावी, याकरिता राजू उंबरकर यांनी शहरातील छत्रपती चौकात फटाक्याच्या आतिषबाजीत व स्वागत करून तिला शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ दिले. यापुढें मनस्वीला तिच्या क्षेत्रात काही अडचण आल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिच्या सोबत खंबीरपणे उभी राहणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी रोटरी क्लब ऑफ ब्लँक डायमंड सिटी वणी तर्फेसुद्धा मनस्वीचे स्वागत करून शुभेच्छा देण्यात आली. या प्रसंगी मनसे नेते राजू उंबरकरसह, धनंजय त्रिंबके, अर्चना बोदाडकर, फाल्गुन गोहोकार, रुपेश ढोके, गोविंदराव थेरे, रमेश पेचे, राजू बोदाडकर तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष परेश पटेल, उपाध्यक्ष अश्विन कोंडावार, सचिव धवन अग्रवाल, निकेत गुप्ता, अंकुश जयस्वाल, अनिल उत्तरवार, आशिष गुप्ता यांच्या सह सर्व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश कामारकर यांनी तर आभार शुभम पिंपळकर यांनी व्यक्त केले..