वणी टाईम्स न्युज: ग्राम पंचायत कार्यालयात कर्तव्यावर असताना ग्राम सेवकाला जातीवाचक शिवीगाळ, धमकी व बळजबरीने कागदपत्र नेणाऱ्या मोहोर्ली येथील ग्राम पंचायत सदस्य विरुध्द वणी पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अट्रोसिटी) व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कवडू देवाजी वडस्कर असे गुन्हा दाखल झालेले ग्राम पंचायत सदस्याचे नाव आहे.
फिर्यादी ग्रामसेवक संदीप तातोबा शेंडे (41) रा. नांदेपेरा, ता. वणी यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, ते ग्रामसेवक पदावर कार्यरत असून वणी पंचायत समिती अंतर्गत रांगणा व मोहोर्ली या दोन गावाचा प्रभार त्यांच्याकडे आहे. दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजता मोहोर्ली येथे ग्रामपंचायत कार्यालय शासकीय काम करीत असताना ग्रामपंचायत सदस्य कवडू देवाजी वडस्कर हे ग्रा. पं. कार्यालयात आले व माझ्या बाजूने खुर्चीवर बसले. त्यावेळी सरपंच दीपमाला वडस्करसह पाणी पुरवठा कर्मचारी निखिल झाडे, योजनादुत निखिल कोल्हे व गावातील इतर दोन व्यक्ती कार्यालयात हजर होते.
ग्रामपंचायत सदस्य कवडू वडस्कर यांनी ग्रामपंचायतीचे वीज बिल कोणाला विचारून भरला? मला विचारल्या शिवाय बिल भरायचे नाही. अस म्हणून ग्रामसेवक संदीप शेंडे याला सर्वांसमोर जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच ग्रामसेवक यांचे कपाटातून बळजबरीने मासिक सभेचे प्रोसेडींग रजिस्टर काढून घेऊन गेला. कार्यालयातून जाताना कवडू वडस्कर यांनी ग्रामसेवक शेंडे याला तुला पाहून घेतो. बरबाद केल्याशिवाय सोडणार नाही, अशी धमकी दिली.
गावातील नागरिक व कर्मचाऱ्यासमोर जातीवाचक शिवीगाळमुळे अपमानित ग्रामसेवक संदीप शेंडे यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती वणी यांच्याशी चर्चा करून मोहोर्ली ग्रामपंचायतचे सदस्य कवडू देवाजी वडस्कर विरुध्द वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी ग्रा.प. सदस्य विरुध्द 352, 351 (2), 221 BNS तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 चे कलम 3(2)(VA), 3(1)(S), 3(1)(R) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे करीत आहे.