वणी टाईम्स न्युज : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखूचा साठा वणी पोलिसांनी पकडला. गोपनीय माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी रविवार 15 डिसेंबर रोजी पटवारी कॉलोनी येथील सुधीर बाबाराव बढे यांच्या घरावर धाड टाकली. पोलीस पथकाने घराची झडती घेतली असता एका खोलीत कागदी खोक्या मध्ये तंबाखूचे डब्बे आढळले. त्यानंतर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन यवतमाळ यांना माहिती देऊन मजा 108 जाफरानी तंबाखूचे 120 डब्बे किंमत 1 लाख 11 हजार 265 रुपये जप्त केले.
अन्न सुरक्षा अधिकारी सीता सुरकार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुधीर बढे विरुध्द अण्ण सुरक्षा मानके कायदा कलम 26(2), 27, 30(2)(अ) सहाकलम 59 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 123, 274, 275, व 223 अनव्ये गुन्हा दाखल केला. सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात गुन्हा शाखेचे पीएसआय धीरज गुल्हाने, जमादार विकास धडसे, कॉन्स्टेबल मो.वसीम, श्याम राठोड, गजानन कुडमेथे, निरंजन खिरटकर, अरविंद बुच्चे यांनी पार पाडली.