वणी टाईम्स न्युज : येथील केएफडी कशिश फिटनेस सेंटर व टीम मसुरी नागपूरच्या वतीने दिनांक 8 डिसेंबर रोजी येथील महालक्ष्मी रिसॉर्टमध्ये फैशन रनवे व काऊचर कार्निवल फेस ऑफ ब्लॅक डायमंड सिटीचे आयोजन करण्यात आले होते. या फैशन शो मध्ये पहिल्यांदा मुक बधीर स्पर्धकांनी रॅम्प वॉक करुन परीक्षक आणि दर्शकांचे मन जिंकले. शहरातील रामदेव बाबा मुक बधीर विद्यालयातील या स्पर्धकांना रॅम्प वॉक करण्याचे प्रशिक्षण मिसेज इंडिया 2024 विजेत्या देवश्री बंडेवार नागपूर हिने दिले. ह्या विदर्भ स्तरीय फैशन शो मध्ये पुणे, नागपूर, हिंगोली व ओडिसा राज्यातून स्पर्धकांनी भाग घेतला.

केएफडी फैशन शो मे सहभागी महिला गटातून वणीची शीतल जयस्वाल ‘फेस ऑफ ब्लॅक डायमंड’ ठरली. तर वेदांती उंबरकर ही फर्स्ट रनरअप व प्रियंका साव व श्रुती पुरम ह्या सेकंड रनर अप ठरल्या. क्लासिक क्वीनचा खिताब सविता मुकेश साहू हिने पटकाविला. मिस वणी श्रेणीत मिताली पांडे ‘फेस ऑफ ब्लॅक डायमंड’ तर राणी देशमाने फर्स्ट रनर अप म्हणून ठरली. स्वाती बत्रा, मानसी मडावी आणि अंजली मत्ते हिने सब टायटल जिंकले.
या फैशन शो मध्ये मुलं मुलीच्या गटातून फेस ऑफ ब्लॅक डायमंड सिटी म्हणून आयशा अहमद हीची निवड झाली. रिया शर्मा, कर्तव्या धानोरकर व संयुक्ता ढवळे ही मुली फर्स्ट व सेकंड रनर अप ठरल्या. मुलांमध्ये एजाज अहमद व रियान बंडेवार विजेता ठरले. फैशन शो मध्ये परीक्षक म्हणून विकास चहारे (मुंबई), निशांत शंभरकर (नागपुर), आदित्या मेकरतवार, दीप्ति बोबडे, सुश्मिता सपरे (नांदेड) यांनी काम पाहिले.
फैशन शो मध्ये सहभागी स्पर्धकांचे परिधान डिझाईन साठी सरिता नांदे व नांदेड येथील तहरिन सदफ हिने सहकार्य केले. स्पर्धकांच्या मेकअपसाठी मॅजिक टच, नागपूर व आकाश मॅकअप स्टुडिओ वणी यांचे सहकार्य लाभले. शहरात पहिल्यांदा आयोजित फैशन शो च्या आयोजनासाठी महालक्ष्मी रिसॉर्ट, उत्तरवार मोटर्स, कल्पना सायकल्स, धनश्री कापड केंद्र, जय समाधा फूड, हरबो क्रिअशन, पूर्णिमा कन्नमवार (अमरावती), सरोज भंडारी, वैशाली सुराणा, लिटिल क्रेझी, अमरावती यांचे विशेष सहकार्य मिळाले. फैशन शो चे प्रमुख उद्घाटक म्हणून माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व महालक्ष्मी रिसॉर्टचे संचालक लक्ष्मण उरकूडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केएफडी च्या संचालिका कशिश पुण्यानी, विजय पुण्यानी, देवश्री बंडेवाऱ, सनी सिंग, सत्यजीत ठाकूरवार, दीपमाला ठाकुरवार, मधुरा ठाकूरवार यांनी अथक प्रयास केले.
पहा फैशन शो चे काही क्षण :