वणी टाईम्स न्युज : महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथ घेतली. सायंकाळी 5.30 वाजता मुंबईचे आझाद मैदान येथे आयोजित या शपथग्रहण सोहळ्याचे वणी भाजप तर्फे लाईव्ह प्रसारण करण्यात आले. यासाठी छत्रपती शिवाजी चौक येथे मोठी वॉल स्क्रीन, साऊंड सिस्टीम व नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
शपथ ग्रहणचे लाईव्ह प्रसारण बघण्यासाठी भाजपचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, विजय चोरडिया, दिनकरराव पावडे, संजय पिंपळशेंडे, विजय पिदुरकर, रवी बेलुरकर, विनोद मोहितकर, गजानन विधाते, ललित लांजेवार, संतोष डंभारे, चंद्र फेरवाणीसह शहरातील अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेताच सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. यावेळी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली.