वणी टाईम्स न्युज : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. निवडणूक आखाड्यात उतरलेल्या मविआ, महायुती, मनसे आणि अन्य उमेदवाराकडून प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवार रैली व पदयात्रा काढून शक्ती प्रदर्शन करीत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर आज समर्थकांसह शहरात रॅली काढून मतदारांच्या भेटी घेणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. यापूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची शहरात जंगी सभा झाली होती.
मनसेची रैली दुपारी 2 वाजता शासकीय मैदानावरून निघून खाती चौक, गांधी चौक, दीपक चौपाटी, टागोर चौक, आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी असणार वणी विधानसभेतील हजारों मनसे कार्यकर्ता या रैलीत सहभागी होणार आहेत. आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे व शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची वणीत जंगी सभा झाली. भारतीय जनता पक्षाचे उमेदवाराच्या प्रचाराला अद्याप कोणत्याही स्टार प्रचारक यांची सभा झाली नाही. त्यामुळे ही लढत मविआ विरुद्ध मनसे अशीच होणारं का ? अशी चर्चा आहे. मविआचे उमेदवार संजय देरकरसुद्धा आज शहरात पदयात्रा काढून शक्ती प्रदर्शन करणार आहे.