वणी टाईम्स न्युज : विधानसभा निवडणुकांची वेळ जसं जसं जवळ येत आहे, तसं तसं प्रचार कामाला वेग आला आहे. राजु उंबरकर हे वणी विधानसभा मतदार संघातून मनसेचे उमेदवार आहे. निवडणुकीत राजू उंबरकर यांचा विजय व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांच्या सौभाग्यवती तृप्ती उंबरकर व भावजय रोहिणी उंबरकर यांनी प्रचाराची कमान हातात घेतली आहे. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांसह तृप्ती व रोहिणी उंबरकर दिवसा आणि रात्री उशिरा पर्यंत शहर आणि ग्रामीण भागातील मतदारांची भेटीगाठी घेत राजु उंबरकर यांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहे.
मनसेचे उमेदवार राजु उंबरकर यांनी मतदार संघातील गोर गरीब कष्टकरी लोकांची निस्वार्थ भावनेने मदत केली आहे. अल्प भू धारक शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे वाटप, गरीब कुटुंबातील मुलींचे स्व:खर्चाने लग्न, मुलींचे शिक्षण, हजारों बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देणे, अपघातात जखमी व शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत, नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा इत्यादी अनेक सेवा कामात राजू उंबरकर सतत सक्रिय असतात.
या सर्व कामाची आठवण करून देत वणी विधानसभा अंतर्गत वणी, मारेगाव व झरीजामणी तालुक्यातील गावागावात व शहरातील प्रत्येक गल्ली मोहल्यात डोअर टू डोअर फिरुन उंबरकर जावा जावा प्रचार करीत आहे. मतदारही तृप्ती उंबरकर यांच्या प्रचाराला प्रतिसाद देत राजू उंबरकर हाच ‘कामाचा माणूस’ असल्याची ग्वाही देत आहे.