आमदारकीसाठी भाऊगर्दी
वणी टाईम्स न्युज : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत वणी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्यास इच्छुक तब्बल 20 जणांनी 26 उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यात भाजप, शिवसेना, काँग्रेस, मनसे, बसपा, वंचित बहुजन आघाडी, सिपीआय, राष्ट्रीय गोंडवाना पक्ष, संभाजी ब्रिगेड सह 12 जणांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे महाविकास आघाडी कडून उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज काँग्रेस नेता संजय खाडे यांनीही मंगळवारी दुपारी दोन अर्ज भरले.
वणी विधानसभा मतदार संघातून आमदारकी साठी विद्यमान आमदार संजीवरेड्डी बापूराव बोदकुरवार यांनी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून 4 अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू मधुकरराव उंबरकर यांनी 2 तर महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना (उबाठा) चे संजय नीलकंठराव देरकर यांनीही 2 अर्ज दाखल केले. संजय रामचंद्र खाडे यांनी एक अर्ज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उमेदवार म्हणून तर एक अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून भरला.
याशिवाय अरुणकुमार रामदास खैरे (बसपा), राजेंद्र कवडूजी निमसटकर (वंचित बहुजन आघाडी), अनिल घनश्याम हेपट (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया), प्रवीण रामाजी आत्राम (राष्ट्रीय गोंडवाना पार्टी), अजय पांडुरंग धोबे ( संभाजी ब्रिगेड पार्टी) यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केले. अपक्ष उमेदवार म्हणून यशवंत शिवराम बोंडे, देवराव आत्माराम वाटगुरे, सुनील गणपतराव राऊत, राहुल नारायण आत्राम, रत्नपाल बापूराव कनाके, निखिल धर्मा ढुर्के, केतन नथुजी पारखी, संतोष उद्धवराव भादिकर, आसिम हुसैन मंजूर हुसैन, हरीश दिगांबर पाते आणि नारायण शाहू गोडे यांनी अर्ज भरले.
बुधवार 30 ऑक्टोबर रोजी नाम निर्देशन पत्रांची छाननी आणि 3 नोव्हेंबर रोजी उमेदवारी परत घेण्याची तारखेनंतर निवडणूक आखाड्यात किती जण शिलक राहणार हे स्पष्ट होईल.