वणी टाईम्स न्युज : वणी पोलीस स्टेशन हद्दीत कुंभारखणी येथे डब्ल्यू सी एल कॉर्टरचे मागे सुरु असलेल्या कोंबड बाजारावर वणी पोलिसांनी धाड मारली. रविवारी दुपारी 2.30 वाजता दरम्यान करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी 10 ते 12 जिवंत व मृत कोंबडे व 3 दुचाकी जप्त केली आहे. पोलिसांची धाड पडताच कोंबड बाजारात आलेले लोकं सैरभेरा पळून गेले तर 5 जुगारी पोलिसांच्या हाती लागले.
पांडुरंग नत्थुजी क्षीरसागर (35) रा.सुकनेगाव, देवराव सोनु मेश्राम (45) रा. बोटोनी, ता. मारेगाव, खुळेश्र्वर वसंता काटकर (40) रा. घोन्सा, मधुकर नामदेव ठेंगणे (29) रा.गोधनी, अनिल वासुदेव खारकर (40) रा. कोळगाव (साखरा) असे आरोपीचे नाव आहे. या कारवाईत 3 दुचाकी किंमत 50 हजार, कोंबडे व काती तसेच नगदी 820 रू. असे एकूण 51 हजार 620 रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आले. सदर कार्यवाही ठाणेदार अनिल बेहरानी यांचे नेतृत्वात पीएसआय सुदाम आसोरे व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.