वणी टाईम्स न्युज : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी मंगळवार 22 ऑक्टोबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वणी विधानसभा मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू मधुकरराव उंबरकर हे शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राजू उंबरकर नामांकन दाखल करताना विधानसभा क्षेत्रातील वणी, मारेगाव व झरी जामणी तालुक्यातील हजारो मनसे कार्यकर्ता उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसे प्रवक्ता यांनी दिली आहे.
येथील शासकीय मैदान पाण्याची टाकीजवळ येथून हजारो कार्यकर्त्यांसह राजू उंबरकर हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवारायांची अश्वारूढ प्रतिमेला अभिवादन करून शुक्रवारी सकाळी 11 वाजता ते तहसील कार्यालयात नामांकन दाखल करणार आहेत. वणी विधानसभा मतदार संघात सर्वात पहिले राजू उंबरकर यांची उमेदवारीची घोषणा स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वणी येथे केली होती. तेव्हा पासून मनसे कार्यकर्ता कामाला लागले होते.