वणी टाईम्स न्युज : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपकडून जोरदार ब्रँडिंग सुरु करण्यात आली आहे. यासाठी देवा भाऊ नावाचं नवकोरं गाण लॉन्च करण्यात आलं आहे. हे गाण वाजवून भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे.
देवा भाऊंच गणित काय ?
महायुती सरकारची लाडकी बहीण योजना राज्यभरात प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. योजनेच्या श्रेयासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते उत्साहाने जाहिरातबाजी करत आहेत. आता बहिणींचा भाऊ ‘देवा भाऊ’ या गाण्यामार्फत भाजपाकडूनही महायुती सरकारच्या कार्याची जाहिरात केली जात आहे. लोकांपर्यंत ही कामे पोहोचवण्यासाठी देवा भाऊ हा सूरमयी ताल निवडण्यात आला आहे.
गाण्यातून फडणवीसांचे आणि सरकारचेही ब्रँडिंग
फडणवीसांचं लक्ष्य नेमकं काय हे सांगताना या गाण्यात दिवसरात्र, एकच लक्ष्य, एकच ध्यास, देश हाच धर्मप्राण आणि श्वास ज्याचा असे प्रेरणादायी बोल आहेत. तसेच, फडणवीसांनी 2014 ते 2019 या पाच वर्षांत आणि 2022 मध्ये सत्तेत आल्यानंतर काय कामे केली यावर प्रकाश टाकला आहे. मुंबईतील कोस्टल रोड, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मुंबईतील विस्तारलेल्या मेट्रोसह फडणवीसांनी राज्याच्या जनतेसाठी काय काय योजना राबविल्या आहेत, यावर या गाण्यात भर दिला आहे.