वणी टाईम्स न्युज : मागील काही दिवसांपासून शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर तसेच चौका चौकात मोकाट कुत्र्यांचे कळप धुमाकूळ घालत फिरत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या मागे हे कुत्रे धावतात. त्यामुळे अनेक दुचाकी चालक पडून जखमी झाले आहेत. शिवाय कुत्र्यांच्या दहशतीमुळे रात्री अपरात्री नागरिकांना घरी जाणे कठीण झाले आहेत.
अनेकदा हे कुत्रे नागरिकांवर हल्ला करतात. त्यामुळे शालेय विद्यार्थी, महिला, वयोवृद्धांना धोका निर्माण झाला आहे. ही कुत्री जनावरांनाही चावत आहेत. पालिका प्रशासनाने तत्काळ मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी लेखी मागणी माजी नगरसेवक सिद्दिक रंगरेज यांनी नगर परिषद येथे निवेदन देऊन केली आहे.