जितेंद्र कोठारी, वणी : मराठी वृत्तपत्र क्षेत्रात नामांकित ‘सकाळ’ या वृत्तपत्राच्या माध्यमातून आठवणीतील वणी 2024 या विशेष पुरवणीचा प्रकाशन सोहळा शनिवारी वणी येथे वसंत जीनींग हॉलमध्ये पार पडला. वणी शहर व तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय गतवैभव बाबत माहिती वाचकांपर्यंत पोहचविण्याच्या प्रयत्न या पुरवणीच्या माध्यमातून सकाळ समूहाने केला आहे.
या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी आमदार विश्वास नांदेकर, दैनिक सकाळचे सर व्यवस्थापक बेंजामिन रॉक, सह संपादक अनंत कोळमकर, सह सर व्यवस्थापक सुधीर तापस, यवतमाळ जिल्हा बातमीदार चेतन देशमुख, सौरभ देशपांडे हे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सकाळचे वणी बातमीदार विनोद ताजने यांनी प्रास्तावीक केल्यानंतर सकाळचे सह संपादक अनंत कोळमकर यांनी सकाळ वृत्तपत्राची समाजाप्रती जवाबदारी आणि भूमिका मांडली. त्यानंतर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी आमदार विश्वास नांदेकर, अध्यक्ष विजय मुकेवार यांनी आजच्या युगात वृत्तपत्र आणि त्यांची जवाबदारी या विषयावर आपले मनोगत व्यक्त करून आठवणीतील वणी पुरवणी प्रकाशित करण्यासाठी सकाळ समूहाचे आभार मानले. आठवणीतील वणी 2024 पुरवणी प्रकाशनार्थ सहभागी लेखक, पत्रकार, जाहिरातदार यांचे मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन जगदीश ठावरी यांनी तर आभार प्रदर्शन तुषार अतकारे यांनी मानले. कार्यक्रमानंतर सर्व मान्यवर व आमंत्रित अतिथी यांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. आठवणीतील वणी 2024 पुरवणी व प्रकाशन सोहळ्यासाठी तुषार अतकारे, विनोद ताजने व सकाळ बातमीदारानी मेहनत घेतली.