वणी टाईम्स न्युज : हल्ली संपूर्ण देशात मुली आणि महिलांवर अत्याचाराची घटना समोर येत आहे. महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थिनी पासून तर चिमुकली मुलीसुद्धा सुरक्षित नाही. मुलींच्या सुरक्षिततेची जबाबदारी शासनाची आहे. त्यामुळे अत्याचाराची घटना रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा. अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वणी नगरमंत्री विनय पुराणकर यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या निवेदनात शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय, शिकवणी वर्ग परिसरात पोलीस पेट्रोलिंग करणे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी 24X7 सुसज्ज पथक नियुक्ती करणे, शाळा, महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी, चौकीदार यांची चारित्र्य तपासणी करणे बाबतची मागणी केली आहे. निवेदन देताना विनय पुराणकर सह अ.भा वि. प. चे सदस्य उपस्थित होते.