वणी टाईम्स न्युज : श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर राज्यात दहीहंडी फोडण्याचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जाते. मुंबई, ठाणे सह इतर मोठ्या शहरात दहीहंडी उत्सव प्रख्यात आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वणी शहरात विदर्भातील सर्वात मोठे दहीहंडी महोत्सवाचे आयोजन शुक्रवार 30 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. स्थानिक शासकीय मैदानावर आयोजित या उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणून सिने अभिनेत्री माधुरी पवार हीची उपस्थिती असणार आहे.
दहीहंडी उत्सवासाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली असून विदर्भातील अनेक जिल्ह्यातील गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी सहभागी होणार आहेत. दुपारी 4 वाजे पासून रात्री 10 वाजे पर्यंत दहीहंडीचा थरार नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे. या दहीहंडी उत्सवचा आनंद लुटण्याचे आवाहन मनसे नेते राजू उंबरकर यांनी केले आहे.