वणी टाईम्स न्युज : मालवण राजकोट येथे स्थापित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 28 फूट उंच पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी जनतेत संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवारायांची निकृष्ट प्रतिमा तयार करणाऱ्या शिल्पकार, कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी युवासेना यवतमाळ जिल्हा समन्वयक समीर लेनगुळे यांनी केली आहे.
युवासेना (उबाठा) तर्फे उप विभागीय अधिकारी वणी यांना दिलेल्या निवेदनात भाजप सरकारच्या काळात वारंवार शिवरायांची जाणीवपूर्वक अवमनाना होत असल्याचा आरोप युवासेनाने केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र राज्याची अस्मितेचे प्रतीक आहे. त्यांची अवमानना कदापि सहन केली जाणार नाही. असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदन देताना समीर लेनगुळे, प्रशांत बलकी, आकाश आसुटकर, मंगेश भोयर, हरिदास केलझरकर उपस्थित होते.