वणी टाईम्स न्युज: लोकसभा निवडणुकीत जनतेने माझ्यावर विश्वास दाखवल्याने मी खासदार झाली आहे .त्यामुळे जनतेची सेवा करणे हेच माझे प्रथम कर्तव्य आहे. लोकसभा क्षेत्रातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे मी प्रयत्न करणार. असे आश्वासन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सोमवार 12 जुलै रोजी वणी येथे आयोजित जनता दरबारात दिले.
लोकसभेत मला जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिल्याने जनतेनी सांगितलेली काम कर्तव्य समजून मी करणार आहे. लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यात मी प्रामुख्याने वेळोवेळी जनता दरबार घेणार आहे. या माध्यमातून जनतेशी देखील नाळ जुळवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. आरोग्य, वीज, रस्ते व व महसुली कामे तात्काळ व्हावी या करीता देखील मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करणार आहे. अधिकाऱ्यांनी देखील सामान्य नागरिकांची कामे त्वरित करून द्यावी. असे देखील मत यावेळी खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले. यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या समस्यांची निवेदने खासदार धानोरकर यांना दिली.