वणी : येथील भाजीमंडीच्या गल्लीत सुरु असलेल्या झंडीमुंडी व जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. 16 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता करण्यात आलेल्या या कार्यवाहीत पोलिसांनी 6 जणांना अटक केली. तर जुगार अड्डा चालविणारा मुख्य आरोपी अब्दुल हाफिज उर्फ टापू हा फरार होण्यास यशस्वी झाला.
पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांना मिळालेल्या माहितीवरून पोलीस उप निरीक्षक सुदाम आसोरे व पोलीस पथकाने भाजीमंडीत संडासच्या बाजूला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. त्यावेळी पोलिसांना पाहून मुख्य आरोपी टापू हा पळून गेला. तर एजाज पीरखान पठाण रा.शास्त्रीनगर, प्रमोद देवगिरकर ता. विराणी टाकीज रोड, सय्यद जाफर रा. मोमिनपुरा, गणेश भेंडाले रा. गणेशपूर, अशोक मामीडवार रा. तलाव रोड, महेश झुरमोरे रा. सुभाषचंद्र चौक वणी या 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आरोपीकडून पोलिसांनी जुगार खेळविण्यासाठी वापरण्यात येणारी कवड्या, आकडे लिहिलेले प्लास्टिकचा कपडा व नगद 5 हजार 570 रुपये जप्त केले. अटकेतील व फरार आरोपीविरुद्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) सहकलम 109 IPC नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.