जितेंद्र कोठारी, वणी : पाचशे वर्षाच्या विशाल संघर्षानंतर अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रावर उभारलेल्या, जगभराचे उत्सुकता स्थान असलेल्या भव्य श्रीराम मंदिरात 22 जानेवारी 2024 रोजी श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठाचे भव्य समारंभ आयोजीले आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देश परदेशातील नेते, व्हीव्हीआयपी, साधुसंतसह 6 हजार मान्यवरांना श्री राम मंदिर ट्रस्टतर्फे आमंत्रित करण्यात येत आहे.
या भव्यदिव्य सोहळ्यात धर्माचार्य म्हणून वणी येथील येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाचे प्रमुख, सुविख्यात वक्ता तथा लेखक आणि गाणपत्य संप्रदायाचे श्रेष्ठ उपासक आणि प्रचारक विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांना आमंत्रण मिळाले आहे. डॉ. पुंड यांना धर्माचार्य स्वरूपात प्राप्त झालेले आमंत्रण वणीकरांसाठी एक वैशिष्ट्यपूर्ण गौरव आहे. वणी शहराचा सांस्कृतिक व धार्मिक इतिहास आहे. आणि आता मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम प्रतिष्ठापनाचे साक्षदार म्हणून वणीच्या गौरवशाली इतिहासाला आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
विश्व हिंदू परिषद विभाग मंत्री रामजी लोखंडे तथा विश्व हिंदू परिषद यवतमाळ विभाग सहमंत्री प्रदीप खराटे यांनी श्रीराम मंदिर ट्रस्टचे सचिव चंपत राय यांचे सहिनिशी पाठविण्यात आलेली आमंत्रण पत्रिका ससन्मान डॉ. स्वानंद पुंड यांना ससन्मान प्रदान केली.