जितेंद्र कोठारी, वणी : लायन्स क्लब वणीचे अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर यांना लायन्स इंटरनॅशनल रीजन -7 “बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड ” ने गौरविण्यात आले आहे. 09 जून रोजी ब्रहम्पुरी येथे आयोजित रीजन कॉन्फरन्स कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ला.राजाभाऊ पाथ्रडकर यांना हा अवॉर्ड देण्यात आला. यावेळी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट वणीचे अध्यक्ष आमदार ला. संजीवरेड्डी बोदकुरवार यांना “लिजेंड ऑफ द रिजन” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब डिस्ट्रिक 3234H1 चे डिस्ट्रिक गव्हर्नर लायन बलविंदरसिंग विज व रीजन चेअरपर्सन लायन रामकुमार झाडे उपस्थित होते. यावेळी लायन्स क्लब ऑफ वणीला “आयकॉन ऑफ रीजन” व सिग्नीचर ऑफ ॲक्टिविटी” पुरस्काराने प्रदान करण्यात आले.
बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड विजेता लायन राजाभाऊ पाथ्रडकर, लिजेंड ऑफ द रिजन लायन संजीवरेड्डी बोदकुरवार आणि लायन्स क्लब वणीचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.