वणी टाईम्स न्युज : चंद्रपूर, वणी , आर्णी लोकसभा मतदार संघातून नव निर्वाचित खासदार मा. प्रतिभाताई धानोरकर यांचे आज गुरूवार 6 जून रोजी वणी शहरात प्रथम आगमना निमित्त भव्य विजयी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षांतर्फे सायंकाळी 6 वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खा. प्रतिभा धानोरकर यांचे सत्कार व भव्य रैली काढण्यात येणार आहे.
खासदार प्रतिभाताई यांचे सत्कार व विजयी मिरवणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व वणीकर नागरिकांनी सहभागी व्हावे. असे आवाहन काँग्रेस नेते संजय खाडे व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी केला आहे.