वणी टाईम्स न्युज : वरिष्ठ नागरिकांना उद्भवणाऱ्या विविध आजार, शारीरिक व मानसिक समस्या समोर जाणाऱ्या महिलावर्ग तसेच विद्यार्थी व युवा पिढीमध्ये वाढत असलेली नैराश्य, उदासीनता व तणावाची परिस्थिती योग थेरेपीच्या माध्यमातून दूर करता येते. मोबाईल व नशेच्या आहारी गेलेल्या युवा पिढीमध्ये संस्कार जागृत करून व्यक्तिमत्त्व विकास करण्याच्या उद्देशाने भारत स्वाभिमान ट्रस्ट व पतंजली महिला योग समिती, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने 1 व 2 जून ला श्री जैताई मंदिर परिसरात मोफत योग थेरपी, योग संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
बालकांच्या विचित्र वागण्यामुळे आज पालकवर्ग त्रस्त आहे. त्यांना मुलाबाळांच्या भविष्याची चिंता सतावते आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण योग शिबिर मध्ये मोबाईलचे व्यसन, पाकिटबंद अन्नाचे दुष्परिणाम, रोगप्रतिकारशक्ती, मनाची एकाग्रता, फुफ्फुस हृदय बळकटी, स्मरणशक्ती कशी वाढवावी? रागावर नियंत्रण ई. संबंधाने सखोल मार्गदर्शन महाराष्ट्रातील अग्रगण्य योग प्रशिक्षक सेवानिवृत्त इंजिनिअर संजय खोंडे (संघटन मंत्री तथा रिसर्च स्कॉलर) पतंजली योग समिती नागपूर हे करणार आहेत.
आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 ची अधीकृत थीम “महिला सक्षमीकरणासाठी योग” ह्या उद्देशाला अनुसरून दि. 1 जून रोजी शिबिरात महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. तर जेष्ठ नागरिकांच्या वयोमानानुसार उद्भवणाऱ्या शारीरिक, मानसिक व भावनिक समस्या ई. वर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन लाभणार आहे. तरी दररोज सकाळी 5.30 ते 7.30 वाजेपर्यंत होणाऱ्या या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिक व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रा. महादेव खाडे, लक्ष्मण इदे, माया माटे, रमेश बोबडे, विजया दहेकर, लता थेरे, गुलाब निते, सुधाकर गारघाटे, दिगांबर गोहोकर, वसंत उपरे, राजकुमार पाचभाई, ममता श्रीवास्तव, जयप्रकाश राजूरकर, उषा चिकटे, सुषमा मोहितकर, स्वप्ना पावडे, ज्योत्स्ना खोकले, रजनी चवने, शारदा काकडे, नंदा काळे, संगिता चिकटे, डॉ. अरुण एकरे, विजय मत्ते, विजय ढाले, सुरेश बागळदे यांनी केले आहे.