वणी टाईम्स न्युज : पतीपासून विभक्त माहेरी राहणाऱ्या विवाहितेने कौटुंबिक हिंसाचाराचा केस दाखल करुन कोर्टाच्या मार्फत दोन हजार रुपये अंतरिम खावटी मिळविली. तर दुसरीकडे कायदेशीर घटस्फोट न घेता तिनं दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं. अशी तक्रार विवाहितेच्या पतीने मारेगाव पोलिसात दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी पत्नी, पत्नीचे आई, वडील, काका व लग्नात मध्यस्ती व्यक्तीवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.

तक्रारदार पती विजय रामदास आसुटकर (35) रा. खैरी, तालुका राळेगाव येथील रहिवासी आहे. तक्रारीनुसार त्याचा लग्न एप्रिल 2022 मध्ये मारेगाव तालुक्यात पहापळ येथील पौर्णिमा सोबत रितीरिवाजानुसार झाला होता. लग्नानंतर 10 महिने पौर्णिमा सासरी राहिली. त्यांनंतर तिच्या वडिलांसोबत माहेरी पहापळ येथे गेली तर परत आलीच नाही. 4 महिने उलटूनही तिनं परत सासरी नांदण्यास नकार दिला. त्यामुळे पहापळ येथीलच मध्यस्थीचे मार्फत 100 रुपयांच्या स्टॅम्पवर नोटरी वकिलामार्फत घटस्फोट करारनामा लिहून घेतला. त्यांनंतर दोघ पती पत्नी आपल्या गावी विभक्त राहत होते.
परंतु त्यानंतरही गैरअर्जदार पत्नीने मारेगाव न्यायालयात पती व त्याचे नातेवाईकांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा केस दाखल केला. तसेच ती कायदेशीर पत्नी असल्याचे नमूद करून न्यायालयामार्फत 2 हजार रुपये अंतरिम खावटी मंजूर करवून घेतली. दुसरीकडे पौर्णिमा हिने पांढरदेवी मंदिरात दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करून घेतल्याची माहिती तक्रारदार विजय आसुटकर याला मिळाली. सदर लग्नाचा पुरावा घेण्यासाठी तक्रारदार याचा भाऊ राजू आसुटकर हा तिथे गेला असता गैर अर्जदार विठ्ठल पायघन, नत्थु पायघन, चंद्रकला पायघन, मारोती धांडे यांनी त्याला मारहाण केली.
एकीकडे स्वतःला लग्नाची बायको असल्याचे नमूद करून न्यायालयात पती व त्याचे कुटुंबीय विरोधात न्यायालयात मामला लढवित आहे. तर दुसरीकडे कायदेशीर न्यायालयातून घटस्फोट न घेता दुसरं लग्न करण्याचा गुन्हा गैरअर्जदार पत्नी व त्यांचे कुटुंबियांनी केले आहे. त्यामुळे तक्रारदार विजय रामदास आसुटकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी आरोपी पत्नी पौर्णिमा विजय आसुटकर, विठ्ठल दादाजी पायघन, नत्थुजी दादाजी पायघन, चंद्रकला विठ्ठल पायघन व मारोती धांडे सर्व रा. पहापळ तालुका मारेगाव विरुद्ध कलम 82(1), 115(2), 351(2), 351(3), 3(5), 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे.











