सुशील ओझा, मुकुटबन : येथील सुपरिचित चिकित्सक डॉ. मनोज बडोदेकर व डॉ. सुरेखा बडोदेकर यांची कन्या कु. मानसी बडोदेकर हिने सीबीएसई दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. सीबीएसई बोर्डाचा 13 मे रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालात कु. मानसी बडोदेकर हिने 92 टक्के गुण प्राप्त केले. मानसी वणी येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल शाळेची विद्यार्थिनी आहे. भविष्यात डॉक्टर होण्याचा तिचा स्वप्न असून आपल्या यशाचा श्रेय डॉक्टर आईवडील आणि शाळेतील शिक्षकवृंदाला दिले आहे.