वणी टाइम्स न्यूज : पाटण ते दुर्भा मार्गे आदिलाबाद येथे कत्तलीकरिता नेत असलेल्या 3 गोवंश जनावरांची पाटण पोलिसांनी सुटका केली आहे. गोपनीय माहितीवरून 15 मे रोजी रात्री 12 वाजता दरम्यान दुर्भा फाटा जवळ ही कार्यवाही करण्यात आली. पोलिसांनी टाटा एस वाहन क्रमांक MH29 BE5968 मालवाहू वाहनातून 3 नग बैल किमत 54 हजार तसेच वाहन किमत 6 लाख 50 हजार असे एकूण 7 लाख 4 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी गोवंश तस्कर शेकन्ना संटन्ना मेकलवार रा. सांगडी, जी. आदिलाबाद तेलंगणा व पवन सुधाकर टोंगे रा. वेदड, ता. झरी यास अटक करून त्यांचे विरुद्द प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम व मोटर वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.