वणी टाईम्स न्युज: सार्वजनिक ठिकाणी आपसमध्ये मारामारी करुन शांतता भंग करण्याचा आरोपावरुन तिघांवर वणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल चिंचोलकर (24) रा. इंदिरा चौक वणी, युवराज उपरे (19) व संगम जैन (30) दोघ रा. दत्त मंदिर जवळ वणी असे आरोपीचे नाव आहे.
सोमवार 13 मे रोजी सायंकाळी 5 वाजता वणी पोलीस स्टे.ला फोनद्वारे माहिती मिळाली की, कृषी उत्पन्न बाजार समिती ते विठ्ठलवाडी रस्त्यावर आशा बार समोर काही लोक आपसामध्ये मारामारी करीत आहे. माहितीवरुन पोलीस त्या ठिकाणी पोहचले असता वरील नमूद आरोपी आपसामध्ये शिवीगाळ करुन मारामारी करताना दिसून पडले. पोलिसांनी पंचासमक्ष आरोपींना ताब्यात घेऊन मारामारी करण्याचे कारण विचारले असता दारूचे बिलाचे पैशावरून वाद झाल्याचे सांगितले.
पोलिसांनी ताब्यातील आरोपीची ग्रामीण रुग्णालय वणी येथे मेडिकल तपासणी केली. फिर्यादी पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन होडगिर यांच्या तक्रारीवरून राहुल चिंचोलकर (24) रा. इंदिरा चौक वणी, युवराज उपरे (19) व संगम जैन (30) दोघ रा. दत्त मंदिर जवळ या तिघांवर कलम 160 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.